"Support the ICON Foundation today to make a difference in the lives of the poor and those in need."
"Become a food partner with the ICON Foundation to distribute food in exchange for cards, helping the poor and those in need."
२०२० मध्ये कोरोना काळ आला. तो काळ समाजाच्या सर्व स्तरांसाठी भयानक होता. ह्या काळात गरजू व्यक्तींना अन्नपुरवठ्याचे कार्य देखील आयकॉन फाऊंडेशनने केले. हे कार्य करीत असतांनाच असे लक्षात आले उपासमारीमुळे अनेक लोक गुन्हेगारीकडे वळाले आहेत. आणि भुक हि अशी गोष्ट आहे जी भुकेल्या मनुष्याकडुन काही ही अनर्थ घडवून आणू शकते. आणि म्हणुनच अभ्यास, संशोधन आणि विचार करून "आयकॉन फूड कार्ड"ची संकल्पना अस्तित्वात आली. पण हे फूड कार्ड म्हणजे नक्की काय आहे? आणि अशा कार्डमुळे काय व कोणाला फायदा होणार आहे? चला, जाणून घेऊया, "आयकॉन फूड कार्ड" बद्दलची संपूर्ण माहिती....
आयकॉन फूड कार्डः आयकॉन फूड कार्ड हे आयकॉन फाऊंडेशनचे प्रीपेड कार्ड आहे ज्यामुळे भीक मागणाऱ्या उपाशी व गरजू व्यक्तींना विनामुल्य, अन्न किंवा चहापाणी मिळु शकेल. आयकॉन फाऊंडेशनने अनेक हॉटेल, कँटीन आणि स्टॉल्स सोबत आयकॉन हातमिळवणी केली आहे. अशा हॉटेल, कँटीन आणि स्टॉल्सना आयकॉन फूड पार्टनर म्हटले जाते. भीक मागणाऱ्या उपाशी व गरजू व्यक्तींना आयकॉन फूड कार्ड देणारी कोणतीही व्यक्ति किंवा संस्था म्हणजे आयकॉन फूड डोनर.
आयकॉन फाऊंडेशन कडुन फूड डोनर्स असे कार्ड विकत घेतील आणि हे कार्ड भीक मागणाऱ्या उपाशी व गरजू व्यक्तींना देतील. त्यानंतर ती व्यक्ती आयकॉन फूड पार्टनरकडे ते कार्ड देऊन, विनामुल्य, अन्न किंवा चहापाणी घेऊ शकते.
दिवसाअखेर किंवा ठरलेल्या दिवस व वेळेनुसार आयकॉन
फूड पार्टनर्स जमा झालेले कार्ड आयकॉन फाऊंडेशनला परत देऊन पैसे घेईल. अशा रितीने कार्डचा वारंवार वापर होईल आणि उपाशी व गरजू व्यक्तींना अन्न किंवा चहापाणी मिळु शकेल. हे कार्ड रोख रक्कम व अल्कोहॉलयुक्त पेयांसाठी रिडीम केले जाऊ शकत नाही.